गेल्या १५ वर्षांपासून अनंत चतुर्दशीच्या दिवशी बंडगार्डन घाटावर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते . महानगरपालिकेचे कर्मचारी , पोलीस बांधव व भगिनी याचा लाभ घेतात . 20 ते 2५ हजार नागरिक याचा लाभ घेतात.
दरवर्षी १५ ऑगस्ट व 2६ जानेवारी रोजी प्रभागातील नागरिकांसाठी मोफत PUC कम्पचे आयोजन करण्यात येते .
दरवर्षी पंढरपूरला जाण्याऱ्या वारीतील वारकऱ्यांसाठी मेडिकल कॅम्प आयोजित करण्यात येतो तसेच त्यांना खजूरवाटप करण्यात येते .
स्वाइनफ्लूच्या दरम्यान च्यवनप्राशचे वाटप करण्यात आले .
प्रभागातील युवकांसाठी डॉन बास्को येथील मैदानावर फूटबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले .
प्रभागातील लहान मुळे व युवकांसाठी क्रिकेट मॅचेस चे आयोजन कोरेगाव पार्क मध्ये केले जाते .
गौरी गणपती उत्सवामध्ये गौरी सजावट करण्यात येते महिला वर्ग उत्साहाने यात सहभाग घेतात
दिवालीहस्यान बालचमूंसाठी किल्ला स्पर्धेच आयोजन करण्यात येते . यामध्ये मुलांना अनेक शालेय बक्षीसे दिली जातात.
लेन नं ६ मधील वागसकर उदयानामध्ये योगा प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले .